वाढदिवसाच्याच दिवशी मृत्यू; पाचोर्‍यातील दुर्दैवी घटना


पाचोरा प्रतिनिधी । वाढदिवसाच्याच दिवशी येथील एका तरूणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

पाचोरा येथील देशमुखवाडी भागातील रहिवासी विजय गोकुळ पवार उर्फ(पिंटू पवार) वय ३८ याचा काल म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. मात्र याच दिवशी रात्री ९ वाजता त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना आई,एक बहीण, भाऊ एक मुलगा, पत्नी असा परिवार होता. दरम्यान, वाढदिवसाच्याच दिवशी अंतिम श्‍वास घेण्याच्या दुर्दैवी योगाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Add Comment

Protected Content