नवी दिल्ली (वृत्तसेवा) मध्य आशियातील तजिकिस्तान या देशात जोरदार भूकंप झाला असून या भूकंपाचे हादरे पाकिस्तानपासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी जाणवल्याचे समजते. या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केलची असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे.
ताजिकिस्तानातील दक्षिण कोफ्रानिहोन परिसरात आज सकाळी आठच्या सुमारास भूकंप झाला. या भूकंपाचे तीव्र धक्के येथील अनेक इमारतींना जाणवले. या भूकंपानंतर काही वेळातच पाकिस्तानातील काही शहरांना भूकंपाचे धक्के बसले. त्यानंतर दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले आणि शहराच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळू लागल्या. उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळते आहे. तत्पूर्वी 12 फेब्रुवारीला बंगालच्या खाडीत भूकंप आला, त्याचे झटके तामिळनाडूतल्या काही भागातही जाणवले होते. बंगालच्या खाडीत सकाळी 7.02 वाजता भूकंप आला होता, ज्याची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल होती. भूकंपाचे झटके चेन्नईतही जाणवले होते. त्यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू बंगालच्या खाडीजवळच्या समुद्रतळाशी 10 किलोमीटर खोलवर आहे.