मिटकरींचे ते वक्तव्य व्यक्तिगत – धनंजय मुंडे

मुंबई, लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | इस्लामपूर सभेत राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी हिंदू धर्मातील कन्यादान प्रथेवर टीका केली होती, यावर ते वक्तव्य लग्नाच्या संदर्भात असून मिटकरींचे ते वक्तव्य व्यक्तिगत असल्याचे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरवा असे म्हटल्यावर राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण होऊन राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख खाज ठाकरे करीत इस्लामपूर येथे एका कार्यक्रमात हनुमान चालीसा विचित्र म्हणत हिंदू धर्मातील कन्यादान प्रथेवर टीका केली होती.
राष्ट्रवादीचे अमोल मिटकरीच्या ब्राम्हण समाजावर केलेल्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला गेला. यावर पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर ब्राम्हण महासंघातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला होता. परंतु अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाविरोधात बोलले असे म्हटले नसून जो मंत्र म्हटला तो चुकीचा आहे. हिंदू धर्माचे ते विडंबन केले आहे. नामाजाविरोधात ते बोलतील का? असा प्रश्न ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी उपस्थित केला.
यावरून जात धर्म आमच्या अंगाला शिवले नाही, मिटकरी जे बोलले त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर खेदजनक असून मिटकरी यांचे ते व्यक्तीगत मत आहे असे म्हणत मिटकरीच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी हात वर केले आहे.

Protected Content