पाचोरा येथे पुस्तक प्रकाशन सोहळा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात समतावादी साहित्य शिक्षक मंडळातर्फे भव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी १४ पुस्तके प्रकाशित झाली.

येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत इंग्रजी विषयाचे डॉ. अतुल सूर्यवंशी यांचे “शोभा डेज फीमेल कॅरेक्टर्स सायकोअनालीटीकल स्टडी” या इंग्रजी पुस्तकाचे ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते जळगाव येथे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शुक्राचार्य गायकवाड हे होते. मंचावर डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, बी.एस.एन.एल. चे सेवानिवृत्त अधिकारी मंगल शिरसाठ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब विश्वासराव पाटील, प्रशांत पब्लिकेशनचे संचालक प्रदीप पाटील, एरंडोलचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, समतावादी साहित्य शिक्षक मंडळाचे अध्यक्ष भरत शिरसाठ, मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, मानद सचिव महेश देशमुख, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, उपप्राचार्य, प्राध्यापक बंधू – भगिनींनी डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Protected Content