नशिराबाद येथील कच्चे रस्त्यावर तात्पुरती उपाययोजना करावी; राष्ट्रवादी काँग्रेस नशिराबाद नगरपरिषदेला निवेदन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून तातडीने रस्त्यावरील डागडुजी करून उपाययोजना करावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना मंगळवारी १९ जुलै रोजी सकाळी देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शहरातील नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील विकसित झालेल्या वाढीव वस्त्या, उपनगरातील रहिवाशांना यामुळे फारच त्रास सहन करावा लागत आहे. यात रस्त्याची समस्या गंभीर झाली आहे. वाढीव उपनगरात रस्ते कच्चे असल्याने पावसाच्या पाण्यामुळे चिखल होत आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करणे त्रासदायक होत आहे. या रस्त्यांनी चालणे तसेच दुचाकी गाड्या चालवणे ही कठीण झाले आहे.

येत्या आठ दिवसात नगरपरिषदेने तात्पुरती उपाययोजना करून रस्त्यावर मुरूम टाकण्यात यावे, अन्यथा नशिराबाद नगरपारिषदेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी दिला आहे.

Protected Content