शाळेत जाण्यासाठी रस्ता नव्हे तर नदीपात्र हाच मार्ग 

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पावसाने हाहाकार माजविला असून याचा सर्वत्र फटका बसत आहे. परंतू, यामुळे विद्यार्थ्यांना देखील समस्या निर्माण झाल्याने शाळेपर्यंत जाण्याकरिता चक्क रस्त्या नसल्याचे वास्तव चित्र बुलढाण्यातील देऊळगाव राजा आणि सिनखेडराजा येथून समोर आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्यातील दोन जवळ जवळ असलेल्या गावाला आमना नदीची सीमा आहे. जळगाव आणि पिंपळगाव अशी संबंधित गावाची नावे असून या दोन्ही गावातील ग्रामस्थांना , रुग्णांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना रोज हे नदीपात्र पार करून आपला जीव मुठीत घेऊन इकडून तिकडे जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. नदीपात्र मोठं आणि खोल असून इथे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दळणवळण पासून आपण कोसो दूर तर नाही ना असंच काहीच बोलकं चित्र या वरील घटनेवरून म्हटल्यास वावग ठरणार नाही.

 

 

Protected Content