जळगावात गुरूनानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन (व्हिडीओ)

gurunanak jayanti

जळगाव प्रतिनिधी । शिख धर्माचे संस्थापक तथा समाजसुधारक गुरू नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वधर्मिय समाजबांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्यानी गुरूप्रितसिंग यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी तेजेंद्रसिंग महिंद्रा, जगदीशसिंग छाबडा, सुदर्शनसिंग छाबडा, गुरूबक्षसिंग महिंद्रा, गुरूदिपसिंग अहलूवालिया आणि खजानसिंग छाबडा यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे
12 नोव्हेंबर 2019 हे पूर्ण जगात 550 वा गुरु नानक जयंती म्हणून साजरा केला जात आहे. त्या अनुसार गुरुसिंग सभा गुरुद्वारा, जळगांव ही खालील प्रमाणे ही जयंती साजरा करणार आहे.

1) अखंड पाठ साहेब: अखंड पाठ साहेब ची सुरुवात 10 नोव्हेंबरला होऊन, 12 नोव्हेंबर रोजी ह्याची समाप्तही होईल.
2 नगर कीर्तन (शोभायात्रा) – 10 नोव्हेंबर रोजी नगरकीर्तनची सुरुवात श्री गुरुद्वारा साहेब वरून होईल. तर नागरिकीर्तनमध्ये विविध धार्मिक शब्द सांगितले जातील यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
3) लंगर (भोजन)- 12 नोव्हेंबर रोजी अखंड पाठ साहेबची समाप्तीनंतर जेवनाची (लंगर)सेवा. श्री गुरु सिंग गुरुद्वारा, आर.आर.शाळेजवळ दुपारी 12 ते 4 वाजे पर्यंत राहणार असून शहरातील सर्वधर्मिय समाजबांधवांनी या कार्यक्रमाची परीवारासह लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Protected Content