रस्त्याच्या खड्ड्याने घेतला महिलेचा बळी; बोदवडातील घटना

Bodwad news

बोदवड प्रतिनिधी । बांधकाम विभागाने पाठीशी घातलेल्या कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीचे काम न केल्यामुळे २८ ऑक्टोबर १९ रोजी वरखेड येथील महिला दुचाकीने जात असतांना खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात जबर जखमी झाल्या होत्या. जिल्हा वैदयकिय महाविद्यालया उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की, २८ ऑक्टोबर १९ रोजी वरखेड येथील महिला वंदना दिलीप पाटील या जबर जखमी झाल्या होत्या. सदर घटना बोदवड मलकापुर रा.म. क्रमांक २७ वर घडली होती. त्या महिलेचा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गाडीवरुन पडुन अपघात झाला होता. त्यात महिला जबर जखमी झाली असुन उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले होते. अपघातामुळे शरीरातील ९८ टक्के अवयव निकामी झाले होते. त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान रस्त्याची कामे वेळेवर करुन घेतली असती तर आजरोजी अशी दुर्दैवी घटना घडली नसती. सदरील कामे येत्या सात दिवसात सुरु न केल्यास आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा तक्रार अर्जातुन देण्यात आला आहे.

खड्डे भरण्याच्या कामाच्या आदेशाला जवळजवळ १ वर्ष ११ महिने पुर्ण झाले आहेत. यांदरम्यान खड्डे बुजविण्याचे काम बांधकाम विभागाने करुन घ्यायला पाहिजे होते. कोणाच्या तरी वरदहस्ताने ते रखडल्या गेले. बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यात टक्केवारीचे आर्थिक व्यवहार चालत असल्याने ठेकेदारांना अश्या कामांसाठी अभय दिले जाते अश्या चर्चांना तालुक्यात अक्षरक्ष: ऊधान आले आहे.

Protected Content