शाहू नगरात गटारीतील काढलेला गाळ पडून ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

WhatsApp Image 2019 11 08 at 8.33.12 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरतील शाहू नगर भागातील गटार स्वच्छ केली जात नसल्याची तक्रार तेथील रहिवाश्यांनी बुधवार ६ नोव्हेंबर रोजी केली होती. या तक्रारींचे लाईव्ह ट्रेंड्स न्यूजद्वारे थेट प्रेक्षपण करण्यात आले होते. यानंतर मनपातर्फे गटार स्वच्छ करण्यात आली. मात्र गटारीच्या बाहेर टाकलेला गाळ अद्यापही उचलण्यात न आल्याने रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाहू नगरातील रहिवाश्यांनी तेथील अस्वच्छतेबाबत बुधवार ६ नोव्हेंबर रोजी तक्रार केली होती. यानंतर मनपातर्फे गटार स्वच्छ केल्यानंतर गटारीच्या बाहेर टाकलेला गाळ दोन दिवसानंतरही उचलण्यात आलेला नाही. येथील रहिवाश्यांनी याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना कल्पना देऊन देखील गटारी बाहेर पडलेला गाळ उचलण्यात आलेला नसल्याची कैफियत त्यांनी मांडली आहे. नागरिकांच्या घरासमोर गटारातील कचरा टाकण्यात आल्याने तेथे दुर्गंधी पसरली आहे. हा गाळ उचलण्यासाठी मनपा कर्मचारी येत नसल्याने येथील नागरिक स्वतः हा गाळ उचलत आहे. यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. यातून नागरिकांच्या आरोग्य गंभीर प्रश्न बनला आहे. शाहू नगरमध्ये इंदिरा गांधी झोपडपट्टी असून येथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात येत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. या परिसरात मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात राहतात त्यांचा रविवारी ईद-ए-मिलाद हा सण आहे. सणाच्या दिवशीच घरासमोर घाण पडलेली असल्याने  रहिवाश्यांनी मनपा प्रशासनास केव्हा जाग येईल असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे.

Protected Content