स्व. डॉ. अविनाशदादा आचार्य जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

shailendra sonawane

जळगाव (प्रतिनिधी) । स्व. डॉ. अविनाशदादा आचार्य यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार ७ रोजी आयोजित रक्तदान शिबिरात ३१ खेळाडू युवकांनी रक्तदान केले. शहरातील अरूश्री हॉस्पिटल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

स्व.डॉ. अविनाशदादा आचार्य यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अरूश्री हॉस्पिटल येथे गुरुवार दि. ७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ३१ खेळाडू युवकांनी रक्तदान केले. महर्षी व्यास युवा शक्ती संस्था, ७१ ग्रुप वाल्मीकनगर व अरूश्री हॉस्पिटलमधील कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी गोळवकर रक्तपेढीचे जितेंद्र शाह व स्टाफ, ७१ ग्रुप व महर्षी व्यास युवा शक्ती संस्थेचे कांचन नगर व वाल्मिक नगरातील कार्यकर्ते, अरूश्री हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, डॉ. परीक्षित बाविस्कर, श्रीराम बाविस्कर, प्रभाकर सोनवणे, शैलेंद्र सोनवणे, योगेश बाविस्कर, विजय पाटील, डॉ. शाहदाब शेख, योगेश सपकाळे, ललित पाटील, सुमित मराठे, राजू नन्नवरे, आश्विन शंखपाळ, जितेंद्र सोनवणे, बाळू रायसिंग आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content