अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, नाशिक विभागीय युवा अध्यक्षपदी संग्रामसिंह सूर्यवंशी

WhatsApp Image 2019 11 07 at 8.12.28 PM

जळगाव,प्रतिनिधी | अखिल भारतीय क्षत्रिय महासभा,नाशिक विभागीय युवा अध्यक्षपदी जळगाव येथील संग्रामसिंह सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत विविध विभागीय नविन नियुक्त्या करण्यात आल्या असून, येत्या ९ नोव्हेंबरला शेगाव येथे होणाऱ्या अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत महिलांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांस जाहीर पदभार देण्यात येणार आहे अशी माहिती,अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ठा राजेंद्रसिंह राजपूत यांनी दिली. शेगाव येथील रोकडिया नगर मधील मथुरा लॉन्स येथे सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार हरिवंश सिंह ठाकूर, उपाध्यक्ष चंदनसिंह रौतेले, राष्ट्रीय महिला अध्यक्ष दमयंती रॉय चौहाण यांसह सबंध महाराष्ट्रातील राजपूत समाजाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या नवनियुक्त विभागीय पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश…

स्वरूपसिंह बारवाल,औरंगाबाद प्रदेश संचालक वैवाहिक प्रकोष्ठ संगठन(मराठवाडा विभाग), मंगलसिंह रामदुलारसिंह ठाकूर पालघर प्रदेश प्रचारक मंत्री (कोकण विभाग),नरेंद्रसिंह राधेश्याम ठाकूर पालघर प्रदेश संगठन मंत्री (कोकण विभाग),संग्रामसिंह सुर्यवंशी जलगाव अध्यक्ष,विभागीय युवा (ऩाशिक विभाग),श्री राकेशसिंह ठाकूर औरंगाबाद प्रदेश संगठन मंत्री आैरंगाबाद(मराठवाडा) विभाग,श्री तेजराजसिंह धनराजसिंह राजपूत पालघर अध्यक्ष,पालघर जिला युवा,शोभा अशोकसिंह राजपूत खारीगांव कलवा ठाणा अध्यक्षा,ठाणे जिला महिला, सुवर्णा महेंद्रसिंह राजपूत अध्यक्षा,मुलूंड उपनगर महिला,श्रीमती आशा रावल शहादा जिला-नंदूरबार,अध्यक्ष,शहादा शहर महिला,संजयसिंह अशोकसिंह ठाकूर पालघर प्रदेश संचालक जयंती स्मारक,एैतिहासिक प्रकोष्ठ,रूबीसिंह ऱायगड प्रदेश संगठन मंत्री महिला प्रकोष्ठ रायगड, सुवर्णा अभयसिंह शितोडे बदलापूर जिला -ठाणा अध्यक्षा बदलापूर जिला महिला,प्रदिप गोकुल पाटील जलगांव अध्यक्ष जलगाव शहर युवा, शंकर जाधव वर्धा उपाध्यक्ष वर्धा जिला युवा,जयलक्ष्मी बिनवार नागपूर सचिव, प्रदेश महिला प्रकोष्ठ,महेंद्रसिंह सिसोदियाँ औरंगाबाद प्रदेश लेखा परिक्षक (मराठवाडा विभाग). शेगाव येथे होणाऱ्या अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ठा राजेंद्रसिंह राजपूत, जळगाव जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर राजपूत, अतुल सिंह हाडा, नाशिक विभागीय युवा अध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, स्वामी पाटील, स्वप्नील पाटील, महेंद्रसिंह पाटील, बापूराव साळुंखे, नितीन पाटील यांसह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Protected Content