शिंदे गटाला ‘शिवसेना’ म्हणून मान्यता द्या : निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा आणि लोकसभेतील शिवसेनेच्या सदस्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी उभी फूट पाडल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपला गट खरी शिवसेना असल्याचा दावा करत याला मान्यता देण्याची मागणी केली आहे.

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात वेगवान घडामोडी झाल्या. यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४१ तर १० अपक्ष अशा ५१ सदस्यांना सोबत घेऊन भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. त्यांनी पहिल्या दिवसापासून ते आजवर आपण शिवसेनेतून बाहेर पडलेलो नसल्याचे सांगितले आहे. तर आपला गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा त्यांनी आधीपासून केलेला आहे. यातच काल खासदारांनीही स्वतंत्र गट स्थापन करून आपला गटनेता आणि प्रतोद नेमला.

या पार्श्‍वभूमिवर, शिंदे गटाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपला गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा करत याला मान्यता देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर आता केंद्रीय निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content