जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्या (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पीकपेरा निहाय सरसकट पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच पडलेल्या घरांची देखील पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या १५ ते २० दिवसांपासून अवकाळी अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे ज्वारी,मका,कापुस,सोयाबीन, मुंग व उडीद,इत्यादी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बंधु फार मोठ्या संकटात सापडला आहे. सर्व पिके कवडीमोल झालेले आहेत तरी शासनाने त्वरीत पंचनाम्याचे आदेश देऊन ओला दुष्काळी जाहिर करावा शासनाने संकटात सापडलेला शेतकऱ्याला त्वरीत आर्थिक मदत करावी.

तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मातीच्या व कुडाच्या घरांची देखील पडझड झाली असून अनेक कष्टकरी जनतेच्या घरांना तडे गेले व भिंती पडून काही घरे पूर्णपणे नष्ट झाले आहेत. त्यामुळे आपल्या स्तरावरून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, जि. प. अध्यक्षा ना. रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जळगाव लोकसभा विस्तारक सचिन पानपाटील, जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष गोपाळ भंगाळे, पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे आयडी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/356273259069652

Protected Content