अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मजुरीचे पैसे घेऊन चिंचोलीकडे मोटरसायकलने घरी येणाऱ्या मजुराचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिंचोली तालुका येथील रहिवासी पांडुरंग सुकदेव लुल्हे ( मिस्तरी ) वय ३० हा तरूण किनगाव येथे एका दुकानात आपल्या वडीलांसोबत कामाला जात होता. दि. १९ मंगळवार रोजी किनगाव येथील आठवडे बाजार असल्याने वडील सुकदेव लुल्हे व पांडुरंग लुल्हे यांनी आपली कामाची मजुरी दुकानदारांकडुन घेवुन वडील सुकदेव लुल्हे हे बाजाराचा दिवस असल्याने ते बाजार करण्यासाठी निघून गेले तर मुलगा पांडुरंग हा चिंचोली येथे घरी जाण्यासाठी निघाला. मात्र तो मोटरसायकलने एकटा घरी जात असताना किनगाव चिंचोली रस्त्यावर असलेल्या मनुदेवी नाल्याच्या पुलाजवळ त्याच्या मोटरसायकल क्र. एम.एच ३९-बी-३१३९ ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पांडुरंग लुल्हे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी चिंचोली व किनगाव येथे समजताच किनगाव येथील सरपंचपती संजय पाटील, चिंचोली माजी सरपंच अनिल सोळुंके, किनगाव खु.चे सरपंच भुषण पाटील, चिंचोली येथील संजय साळुंखे, किनगाव चे पो.पा.पती सचिन न्हायदे, किनगाव येथील रवी कोळी, चिंचोली येथील अरुण सोनवणे, बंटी सोंळुके, भाऊसाहेब धनगर, चिंचोली येथील गोपाल चौधरी आदिनी घटनास्थळी मदत करून मयत पांडुरंग लुल्हे याचा मृतदेह यावल येथे शवविच्छेदन करीता पाठविला. घटनास्थळी यावल पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी आपल्या कर्मचारी सोबत तात्काळ घटनास्थळ गाठुन रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करून मृतदेह यावल येथे शवविच्छेदन पाठविण्यासाठी मदत केली. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

Protected Content