कुसुंबा येथील दाम्पत्याच्या खूनाचा उलगडा, पैश्यांसाठी दोघांना संपवले; एसपींची पत्रकार परिषद (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील ओमसाईनगरातील आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याच्या खुनाचा उलगडा आज पाचव्या दिवशी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. या हत्याकांडात दोन पुरूषांसह एक महिलांचा समावेश आहे. सर्वांना अटक करण्यात आली आहे. मयत आशाबाईकडून व्याजावर घेतलेला पैसा माफ हाईल आणि तिच्याकडील रोकड आणि सोन्याचे घबाड हाती लागेल या बोताने बेताने खुनाचा कट रचला गेल्याचे जिल्‍हापोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.  

अधिक माहिती अशी की,  तालुक्यातील कुसूंबा भागातील ओमसाईनगरात वर्षभरा पुर्वीच घरबांधुन राहण्यास आलेल्या मुरलीधर राजाराम पाटिल(वय-५४) व त्याची पत्नी आशाबाई पाटिल(वय-४७) या दोघांचा २१ एप्रिल रोजी राहत्या घरात दोरीने गळा आवळून खुन करण्यात आला हेता. एमआयडीसी पोलिसांत दाखल या गुन्ह्यात जिल्‍हापोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या  मार्गदर्शनात स्थानिक गुन्हेचे निरीक्षक किरण कुमार बकाले यांचे  पथके तपास करत असतांना सलग सहा रात्र आणि पाच दिवसांचा तपास पुर्ण करुन गुन्हेशाखेच्या पथकाने चार संशयीतांना ताब्यात घेतले. दोन महिला आणि दोन पुरुश अशा चार संशयीतांना ताब्यात घेतले. कसुन चौकशी केल्यावर गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभागी तिघांनी कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यात देविदास नादेव श्रीनाथ (वय-४०,रा.गुरुदत्त कॉलनी कुसूंबा), अरुणाबाई गजानन वारंगे (वय-३० कुसूंबा) आणि सुधाकर रामलाल पाटिल (वय-४५रा.चिंचखेडा ता. जामनेर) अशांना अटक करण्यात आली आहे.

दांडगी रोकड..अन्‌ सोन्याची लालसा

मयत अरुणाबाई गेल्या अनेक वर्षांपासुन व्याजाचा धंदा करते, तीने नुकतेच दुमजली टोलेजंग घरबांधले असून तिच्या घरात बऱ्यापैकी रोकड आणि सोन्याचे दागिने मिळतील यांची खात्री असल्यानेच देविदास आणि अरुणाबाईने कट रचला. सोबतीला देविदासचा मित्र सुधाकर पाटिल याची मदत घेण्यात आली. अरुणाबाईचे घेणे असलेली रक्कमही द्यावी लागणार नाही आणि तिच्या घरातील घबाडातून हिस्साही मिळेल अशी लालसा अरुणाबाईला हेती. तर सुधाकर कर्जबाजारी झालेला होता. देविदास याला अर्थीक अडचण असल्याने तिघांनी तिचा काटा काढायचा निर्णय घेत बुधवार २१ एप्रिल रोजीच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अगोदर मुरलीधर पाटिल याचा गच्चीवर गळा आवळला. तदनंतर आशाबाईला खाली घरात त्याच दोरीने गळफास देत ठार मारण्यात आल्याची कबुली संशयीतांनी दिली आहे. निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सजय हिवरकर,विजयसींग पाटिल, राजेश मेंढे, सुनील दामोदरे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, रवि नरवाडे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, संतोश मायकल यांच्यासह एकुण ४७ कर्मचाऱ्यांचा विवीध पथकात समावेश हेता.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/495530638304242

 

Protected Content