लोडशेडिंगच्या वेळेत बदल न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा

 

मुक्ताईनगर, प्रतिनिधी ।  ग्रामीण भागात सूर्योदयापूर्वी शेती कामे करण्यावर भर असतांना त्यांना पहाटेच लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रामाणे  मुस्लिम समाजातील पवित्र रमजान महिना सुरू असून त्यांना देखील रोजा (उपवास ) याची सुरुवात करताना दैनंदिन लगबग ही पहाटेच असते, यामुळे लोडशेडिंगच्या वेळेत बदल करून ती सकाळी ६ वाजेनंतर करण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा   तहसीलदार व महावितरणला देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदनाचा आशय असा की ,  सद्या मुस्लीम समाजात अतिशय पवित्र मानल्या जाणारा रमजान महिना सुरु आहे.  या काळात मुस्लीम समाजातील प्रत्येक सदस्य अतिशय श्रद्धेने रोजे (उपवास) करीत असतात. त्यामुळे गाव खेड्यातील अगदी पहाटेच्या वेळात म्हणजेच सकाळी ४ ते ५:३० वाजेपर्यंत मुस्लीम बांधव ,भगिनी रोजे च्या तयारीत असतात. हि वेळ दिवसभराचे रोजेचे नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्वाची असते. आज १३ वा रोजा होता तर उद्या १४ असणार आहे. याकाळात म.रा.वि.वि.कं तर्फे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग केली जाते. यातच शेतकरी बांधवाना देखील शेतात जाण्यासाठी सकाळची वेळ महत्वाची असल्याने शेतकऱ्यांची देखील सकाळची लोडशेडिंग वेळ बदल्याची मागणी आहे.  रमजान महिन्यात सुरु असलेल्या या पहाटेच्या वेळी सुरु असलेल्या लोडशेडिंगमुळे अंतुर्ली , उचंदा,  बेलसवाडी, कुऱ्हा , जोंधनखेडा , धामणगाव , बोरखेडा  यासह अनेक गावात मुस्लीम समाजाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या करीता दररोज सकाळी करण्यात येणाऱ्या लोडशेडिंगच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात येवून सकाळी ६ वाजे नंतर लोडशेडिंग करण्यात यावी. वेळेत बदल तात्काळ करण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती

तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील,  माजी उप तालुका प्रमुख राजेंद्र तळेले, शहर प्रमुख गणेश टोंगे, नगरसेवक संतोष मराठे, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव , नितीन कांडेलकर , जितेंद्र (गोलू) मुर्हे आदी पदाधिकारी शिवसैनिकांची उपस्थिती होती .

 

Protected Content