नक्षलवाद निर्मूलन योजनेत फेरबदल

चतरा (झारखंड):: वृत्तसंस्था । झारखंड-बिहार सीमेला लागून असलेल्या भागाव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी आणि नक्षल कारवाया लक्षात घेता जिल्हा पोलिसांनी मोठे फेरबदल केले आहेत.

पोलिसांनी आपल्या नव्या योजनेसाठी नक्षली आणि गुन्हेगारांचा विचार करून विविध झोन तयार केले आहेत. या झोनची जबाबदारी निडर आणि धाडसी पोलिस अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

तीव्रगतीने पाय पसरणाऱ्या गुन्हेगारीच्या आलेखाला ब्रेक लावण्यासाठी, तसेच नक्षलवाद्यांभोवती फास आवळण्यासाठी निडर आणि तडफदार पोलिस ठाणे प्रभारींच्या व्यतिरिक्त तरुण अधिकाऱ्यांना देखील कामाला लावण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये असलेल्या प्रभारींना संवेदनशील आणि सीमेजवळील भागात तैनात करण्यात आले आहे. तर सन २०१८ च्या बॅचचे तरुण पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर पोलिस ठाण्यांची जबाबदीरी सोपवण्यात आली आहे.

दुसरीकडे गुन्हेगारी आणि नक्षलवादी कारवाया रोखण्यात अपयशी ठरलेल्या अनेक पोलिस ठाणे प्रभारींना इतर जबाबदारी देण्यात आली आहे. तर अनेक पोलिस ठाणे प्रभारींना पदोन्नती दिल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. या सर्व पोलिस ठाण्यांमध्ये नव्याने भरती करण्यात आली आहे.

झारखंडच्या चतरा पोलिसांना अवैध कोळसा उत्खननाविरोधात सोमवारी मोठे यश मिळाले. खरेतर अवैधपणे कोळसा उत्खननासाठी पाठवण्यात येत असलेली स्फोटके जिल्ह्यातील सिमरिया पोलिसांनी पकडली. पोलिसांना हे यश विशेष नक्षलवादी विरोधी अभियानादरम्यान मिळाले. विस्फोटकांबरोबरच पोलिसांनी तस्करांना देखील अटक केली.

विस्फोटकांसह अटक करण्यात आलेला बाइकस्वार तस्कर राजकुमार साव तिलराहून त्याच्या गावी मनातू येथे जात होता, अशी माहिती पोलिस अधिकारी गुलाम सरवर यांनी सांगितले. त्याच्यासोबत दुसरा तस्कर जितेंद्र साव यालाही अटक करण्यात आलीय

Protected Content