मध्यप्रदेशातील काँग्रेस आमदारांचे राजीनामा सत्र

भोपाळ वृत्तसंस्था । मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा सत्र सुरू केल्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे.

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षत्याग केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. बंडाळी करणार्‍या १९ आमदारांनी सामूहिकपणे राजीनामा देऊन याची माहिती सोशल मीडियात जाहीर केली. यानंतर अजून तीन आमदारांनी राजीनामा दिला असून यामुळे राजीनामा दिलेल्या आमदारांची एकूण संख्या २२ झाली आहे. तर अजून काही आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या राजीनामा सत्रामुळे मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आल्याने ते पायउतार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Protected Content