नाना पटोलेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल ! : चित्रा वाघ यांनी विचारला खोचक सवाल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका तरूणीसोबतचा आक्षापार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून यालाच ट्विट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना खोचक सवाल विचारला आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ आज सकाळी समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झालेला आहे. यात चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये नाना हे एका तरूणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे दाखविण्यात आले आहे. काही तासांपासून या व्हिडीओवरच मोठ्या प्रमाणात चर्वण सुरू आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विट करून नाना तुम्ही सुध्दा ? असा प्रश्‍न विचारला आहे.

यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्या म्हणाल्या की, सकाळपासून सोशल मीडियात या व्हिडीओची मोठी चर्चा सुरू आहे. नाना पटोले हे महत्वाचे नेते असून हा व्हिडीओ पब्लीक डोमेनमध्ये आल्यामुळे स्वत: नानांनी याबाबत जनतेला उत्तर देण्याची गरज आहे. वलयांकीत मंडळीच्या विरूध्द अनेकदा महिला तक्रारी करून नंतर मागे घेत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी म्हणत नाना पटोले यांच्या कडून स्पष्टकरण मागितले आहे.

तर, दुसरीकडे नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतांना, आपली लीगल टिम याबाबत अभ्यास करत असून आपण लवकरच याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देऊ अशी माहिती दिली आहे. मात्र या व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content