खा. संजय राऊत यांचा जामीनदारच शिंदे गटात दाखल

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांना ईडी प्रकरणात जामीन राहिलेले भाऊसाहेब चौधरी हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.

नाशिक येथील शिवसेना ठाकरे गटाचे नेते भाऊसाहेब चौधरी यांनी रात्री उशीरा शिंदे गटात प्रवेश घेतला. ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ते उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख होते, तसंच ते संजय राऊत यांचं अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. विशेष बाब म्हणजे तेच ईडी प्रकरणात राऊत यांची जामीनदार आहेत. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी जामीनदारालाच फोडून संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे.

लक्षणीय बाब म्हणजे अलीकडेच भाऊसाहेब चौधरी यांनी संजय राऊत यांचा जामीनदार म्हणून कोर्टात स्वाक्षरी केली होती. संजय राऊतांसाठी स्वत:ची मालमत्ता हमीपत्र चौधरींनी कोर्टात सादर केलं होते. शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी यापेक्षा संजय राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. काल सायंकाळी स्वत: संजय राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. या पाठोपाठ त्यांनी रात्री शिंदे गटात प्रवेश घेतला.

Protected Content