कोरोनाचे सावट : बुस्टर डोसच्या लसीकरणाला येणार वेग

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका अधोरेखीत झाला असतांना केंद्र सरकार बुस्टर डोसच्या लसीकरणाला वेग देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धुमाकुळ सुरू असून अमेरिकेसह अन्य राष्ट्रांमध्येही याचा संसर्ग वाढीस लागला आहे. यात ओमायक्रॉन बीएफ७ हा नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. या अनुषंगाने भारत सरकार देखील ऍक्शनमध्ये आलेली आहे. कालच आरोग्य मंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेतली असून राज्य सरकारांनाही सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत. दुसर्‍या देशांमध्ये कोरोनाची धास्ती असली तरी भारतात लसीकरण चांगले झाल्याने याचा धोका कमी असल्याचे आधीच काही तज्ज्ञांनी सांगितले आहे. तर, काहींनी बुस्टर डोसच्या लसीकरणाला गती द्यावी असे सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडाविया यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. देशातील फक्त २७ टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. याविषयी बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी टास्क फोर्सच्या सदस्यांनी नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असं अवाहन केलं आहे. नागरिकांनी लवकरात लवकर लशीचा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे. लशीच्या चौथ्य डोसबाबत अद्याप कोणताही डेटा समोर आलेला नाहीये. चौथा डोस घेण्याची इतक्यात गरज नाहीये. जोपर्यंत बायवेलेंट लस येत नाही तोपर्यंत चौथा डोस घेण्याची आवश्यकता भासणार नाही, असे प्रतिपादन एम्सचे माजी डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले आहे.

Protected Content