डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सामुहिक राष्ट्रगीत गायनाने देशभक्तीची चेतना जागविल्याचा प्रत्यय आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी महाविद्यालयाचा परिसर दणाणला होता.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत दि. ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य महोत्सवांतर्गत दि. १७ रोजी सकाळी ११ वा. समुह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समुह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम घेण्यात आला.

राष्ट्रभक्तीचा गजर
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात समुह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, अ‍ॅकेडमीक डीन जयंत देशमुख, डॉ. नेहा वझे, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. अमृत महाजन, होमीओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डी.बी. पाटील, डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. दिलीप ढेकळे, प्रा. बापूराव बिटे, प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ. सारंग, डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. विजय मोरे, डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. वैशाली राठोड, डॉ. सुयोग चोपडे, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, रूग्णालय प्रशासन अधिकारी आशिष भिरूड, एन.जी. चौधरी, डॉ. नितीन भारंबे, डॉ. अलोक यादव, डॉ. के.एस.महाजन यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामुहिक स्वरूपात राष्ट्रगीताचे गायन केले. तसेच भारत माता कि जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी देशभक्तीची चेतना जागविली.

Protected Content