भाजपची उलटी गिनती सुरू -नाना पटोले

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपने देशभरात कटुता निर्माण केली असून भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे. त्यांचे परिणाम लवकरच पाहायला मिळतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राज्यसच्या ६ जागांसाठी निवडणुकीसाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र विधानसभेत मतदान प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत सुमारे २७८ आमदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी राज्यसभा निवडणुकीत आपल्याला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. परंतु मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन देण्यास या दोघानाही न्यायालयाने नकार दिला आहे. मतदान सुरु असताना भाजपाकडून आक्षेपानंतर विधानसभेत काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आम्हीच जिंकणार असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजपासून भाजपची उलटी गिनती सुरू झाली असून जी कटुता निर्माण केली आहे. त्याचे परिणाम लवकरच पाहायला मिळणार असून राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी बोलून दाखवला आहे.

Protected Content