श्रीराम माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जळगाव, प्रतिनिधी । आज जागतिक पर्यावरण दिवसानिमित मेहरूण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राकॉचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, नगरसेवक प्रशांत नाईक, अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच शाळेच्या प्रांगणात पिंपळाचे, कडुलिंब, गुलमोहर असे २५ प्रकारचे रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी विलास भदाणे, सलीम इनामदार, अनिल सोनवणे, नगरसेवक शबाना बी सादिक खाटीक, मुख्याध्यापक दिवाकर जोशी, सलमान खाटीक, नईम खाटीक, दिनेश पाटील, अमित तडवी, संतोष चाटे, शाळेतील शिक्षिका संध्या कुलकर्णी, शननो पिंजारी, प्रतिभा पाटील. जयश्री तायडे, संजय बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी भैय्यासाहेब पाटील व प्रशांत नाईक यांचा विद्यालयाच्यावतीने शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.