ग्रा. पं. कर्मचारी , शेतमजुरांचे प्रश्न सोडवणार ; जिल्हाधिकारी यांचे आश्वासन

चोपडा,प्रतिनिधी । जिल्ह्याती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवेदन आणि किनगाव बुद्रुक येथील 15 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निवेदन जळगाव जिल्हा अधिकारी अभिजीत अभिजीत राऊत यांना 10 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक तर्फे सादर करण्यात आले. चर्चा करतांना त्यांनी आश्वासन दिले की कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन भत्ता देणे व ऑनलाइन विमा बाबत जिल्हा परिषदशी बोलू.. या निवेदना बरोबरच लालबावटा शेतमजूर युनियन व किसान सभा तर्फेहि दोन निवेदने देण्यात आली

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगारात मागील महिन्यापासून कपात होत असल्याने व तेही अनेक महिन्यांचे थकीत असल्याने कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य ढासळत असून कोल्हापूर, जालना, बीड, नगर व जळगाव जिल्ह्यातील काही कर्मचारी आत्महत्या व अकस्मात मृत्यूने दगावले आहेत या कर्मचाऱ्यांचे वारसांना 50 लाख रूपये चे विमा कवच लाभ द्या ,. मे 2020पासून रखडलेला पगार कोरोना योद्धांना जिल्हा परिषदेणे परिपत्रक न काढल्याने ग्रामसेवक देत नाहीत.. प्राव्हीडंट फंड कपात‌भरणा नाही.. कर्मचाऱ्यांचे थकीत पगार आले नाहीत ग्रामपंचायत पगाराचा हिस्सा देत नाहीत आदी मुद्दे या निवेदनांमध्ये मांडण्यात आलेले आहेत .

लालबावटा शेतमजूर युनियन आणि किसान सभेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि कोरोना महामारी काळात श्रावणबाळ संजय गांधी योजनांची रखडलेले प्रकरणे निकाली काढा, सर्व असंघटित कामगारांना महामारी काळात दहा हजार रुपये खर्चासाठी द्या.असंघटित शेतकरी शेतमजूर ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी असंघटित कर्मचाऱ्यांना साठ वर्षे वयानंतर दहा हजार रुपये पेन्शन द्या.. गेल्यावर्षी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना मदत द्या.. सुंदर गढी (चोपडा ) येथील पारधी आदिवासींची राहत्या घराची अतिक्रमणे नियमानुकूल करा

या प्रश्नांसाठी सुद्धा विशेषता संजय गांधी योजनांबाबत तहसीलदारांना सूचना देऊ ..असे जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाला सांगितले महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ चे सचिव अमृत महाजन यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र पाटील, मलखान राठोड, प्रदीप जोशी, पंजाब देशमुख, भाऊसाहेब पाटील, सुनील कोळी ,कृष्णा महाजन, पिंटू साळुंखे ,छगन साळूंके ,प्रदीप जोशी, सिकंदर तडवी, अरूण पाटील, अरूण‌ भारंबे, संदीप पाटील, आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता .. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन न दिल्यास ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी मोर्चा व एक दिवसीय संप इशारा देण्यात आला आहे किनगाव बुद्रुक येथील कर्मचारी त्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी ११ आगस्ट पासून बेमुदत संपावर जात आहेत आहेत , तेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे चोपडा यावल चाळीसगाव जळगाव तालुक्यातील कर्मचारी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते

Protected Content