माळण येथे कालभैरवनाथांची यात्रोत्सव

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गोवर्धन-मारवड -बोरगावासह परिसराचे आराध्य दैवत व भारतातील तीन स्वयंभू भैरवनाथापैकी एक असलेल्या श्री कालभैरव नाथांचा दोन दिवसीय यात्रोत्सव माळण नदीकाठी साजरी झाली.

तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणचे भाविकांचे श्रद्धास्थान व परिसराचे आराध्य दैवत असलेल्या भारतातील स्वयंभू स्थान असलेले श्री कालभैरवनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. आज दिवभरात सुमारे एक लाखाच्या जवळपास भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे यात्रोत्सव साजरा करता आला नव्हता, अष्टमी निमित्त संपूर्ण खानदेशासह दुरवरील भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात.दरम्यान कालपासूनच माळन नदीच्या पात्रात पाळणे, पालखे, विविध विक्रेते, खेळने विक्रेते, खाद्यपदार्थांची दुकानांची रेलचेल सुरू झाली होती. संपूर्ण देशात असलेल्या तीन मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिरातील यात्रोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी याठिकाणी येतात.गेल्या दीड-दोन वर्षापासून बंद असलेला यात्रोत्सव यंदा दिमाखात होत असताना परिसरातील नागरिकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.

Protected Content