यावल नगर परिषदच्या उपनगराध्यक्षपदी देवयानी महाजन यांची निवड

यावल, प्रतिनिधी । येथील आज २४ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास यावल नगर परिषदच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने उपनगराध्यक्षपदी देवयानी गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे. 

यावेळी सर्व साधारण सभेच्या पिठासीन अधिकारी म्हणुन तहसीलदार महेश पवार, मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यासह नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी विजय बडे, अभीयंता योगेश मदने, रमाकांत मोरे आदींनी सहकार्य केले. तसेच यावल नगर परिषदच्या उपनगराध्यक्षा पौर्णिमा राजेंद्र फालक यांनी नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 

या रिक्त झालेल्या जागेवर नगरसेविका देवयानी गिरीश महाजन यांचा उपनगराध्यक्षपदाकरीता एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज सुचक नगर परिषदचे गटनेते अतुल वसंत पाटील, अभीमन्यू विश्वनाथ चौधरी, नगराध्यक्ष नौशाद तडवी यांनी सहभाग घेतला. 

नगराध्यक्ष नौशाद तडवी, गटनेते अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, माजी उपनगराध्यक्ष राकेश कोलते, सामाजीक कार्यकर्ते गिरीश महाजन आदींनी त्यांना शुभेच्छा देवुन स्वागत केले आहे.

Protected Content