बंजारा व लबाना समाज विश्व संमेलनाबाबत गोदरी येथे आढावा बैठक संपन्न (व्हिडीओ)

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येणाऱ्या २५ जानेवारी रोजी गोदरी तांडा येथे बंजारा व लबाना समाज विश्व संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याबाबत गोदरी येथे संतांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

यावेळी पाल येथील संत गोपाल चैतन्य महाराज पोहरागड गादीपती बाबू सिंग महाराज लबाना समाज धर्मगुरू तेलंगणा रामसिंग महाराज संघ प्रचारक शरद ढोले संघ कार्यवाहक बाळासाहेब चौधरी धर्म जागरण प्रचारक शाम हर हरे नंदू जी आडे श्याम चैतन्य महाराज दिव्य चैतन्य महाराज भारती महाराज दयाल महाराज आरोग्य दूत रामेश्वर नाईकआदी या बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

येणाऱ्या २५ जानेवारी ते ३० जानेवारी २०२३ या दरम्यान गोदरी तांडा येथे बंजारा व लभाना समाज विश्व संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाला विश्वातील २९ राज्यातील बंजारा व लभणा समाज बांधव उपस्थित राहणार आहे या विश्व संमेलनामध्ये सदर समाजाची संस्कृती व समाज जागरणाचे कार्यक्रम होणार असून धर्माच्या संस्कृती आदान प्रदान संमेलन होणार आहे सदर संमेलन हे बंजारा समाजाचे महा कुंभ होणार असून रामेश्वर नाईक यांच्या माध्यमातून समाज एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

या बैठकीच्या वेळी पाल येथील गोपाल चैतन्य महाराज यांनी आपल्या मार्गदर्शन सांगितले की, “बंजारा व लबाना समाज यांचे पूर्वज शूरवीर होते. व संतांना मारणारा समाज असून आपण आज आपली संस्कृती विसरत चाललो आहे त्यामुळे आपले विचार आचार बदलण्याची गरज असून धर्माची जोडून राहा धर्माची रिक्षा करा धर्म आमचा साथ देईल बंजारा समाज चांगले दिशा देण्याचे काम सर्व समाज बांधवांनी केले पाहिजे. त्याचबरोबर सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन धर्म संमेलन पार पाडण्यासाठी काम करा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात बंजारा समाजाची काशी मानले जाणारी पोहरागड येथील गादीपदी बाबूसिंग महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, “बंजारा समाज विश्वातली सगळ्यात मोठी संस्कृती असलेला समाज असून त्यामुळे मोठ्या संख्येने आपण कार्यक्रमाची नियोजन करावे व समाजासाठी एकत्र येऊन समाजाचे रक्षण करा व संमेलन योग्यरीत्या पार पाडा. असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

यांनी सांगितले की, “हिंदू समाज वाचवण्यासाठी आपण सर्व राज्यात बैठक घेत असून बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणावर सर्वांतराकडे चालला आहे त्यांना वाचवण्यासाठी बंजारा समाजाचे संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून बंजारा समाज संस्कृती व धर्म वाचवण्यासाठी आज संमेलनाची गरज असल्याचे शरदराव ढोले यांनी सांगितले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1108503616689673

Protected Content