‘आयटक’चा जिल्हा परिषदेवर आंदोलनाचा इशारा

चोपडा प्रतिनिधी | चोपडा तालुका आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेची विद्यादेवी बाविस्कर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत ‘आयटक’ने विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर आंदोलनाचा इशारा दिला

आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेचे नेते अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी यावेळी वंदना पाटील, मीनाक्षी सोनवणे, माया धनगर, शालिनी पाटील, शोभा पाटील यांनी चर्चेत भाग घेऊन विविध प्रश्नांची मांडणी केली. बैठकीत उपस्थित प्रश्नाचे निवेदन चोपडा टी एम ओ व जिल्हा परिषदेला देण्याचें ठरले.

बैठकीत २५ मे रोजी टी एम ओ कार्यालयाला जमावे. कर्मचाऱ्यांना १०,००० फरक मिळावा. १२ नोव्हेंबर २१ पासून नॉनस्टॉप कोविड लसीकरण सुरू आहे. त्याचा मोबदला मिळावा. साडीचा खर्च २००० मिळावा. साडीचे, गणवेशाचे पैसे खात्यावर जमा करावे. कुष्ठरोग सर्वेचे पैसे मिळावेत. १ जुलै पासून मंजूर वाढ भत्ता मिळावा. छत्री किंवा छत्र्यांचे पैसे मिळावेत. मोबाईल रिचार्ज दर १०० नाही तर २५० रुपये द्यावा. कबूल केलेले मोबाईल द्यावे, आशांच्या कामांचे सर्व ७६ हेडची माहिती द्यावी. व्हि एच एन डी अंतर्गत आहारासाठी ५०० रुपये द्यावीत. आरोग्यवर्धीनी अंतर्गत लागणारी कागदपत्रे ऑफिसने द्यावीत. थकीत मोबदला द्यावा. आदी प्रश्नांवर सोमवार, ६ डिसेंबर रोजी चोपडा टी एम ओ व जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्याचे ठरले..

बैठकीला सर्व श्रीमती रेखा पाटील, संगीता वाघ, गिरिजा महाजन, शोभा पाटील, सुवर्णा न्हावी, योगेश्वरी पाटील, सुनिता पाटील, रुपाली पाटील, शीतल पाटील सरला कोळी,जयश्री मोरे, अनिता पाटील, माया धनगर, सुनीता कोळी, मालूबाई रायसीग आदी उपस्थित होते..

Protected Content