आरएसएसची बंगळुरूत १५ मार्चपासून वर्षिक बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्णय घेणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक बंगळुरू येथे १५ ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. या बैठकीत सीएए आणि दिल्लीतील हिंसाचार मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक बंगळुरू येथे १५ ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. प्रतिनिधी सभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात निर्णय घेणारी प्रमुख संस्था आहे. दिल्लीत नुकतीच झालेली हिंसा आणि नागरिकता संधोधन कायदा याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनांवर बैठकीच्या बौधिक सत्रात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील संघ व्यवस्थापनाला दिल्लीतील हिंसेवर सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात येऊ शकते.

Protected Content