लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे सात डब्बे घसरले

derail coatch

मुंबई, वृत्तसंस्था | भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसचे जवळपास सात डब्बे रूळावरून घसरले आहेत. सकाळी ७.०० वाजेच्या सुमारास ही घटना कटक येथील नेरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. यामध्ये ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

रेल्वेचे डब्बे रूळावरू घसरण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र दाट धुक्यांमुळे ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेबाबत माहिती मिळाताच घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयांमध्ये हलवले जात आहे.

Protected Content