पाचोऱ्यात कापड दुकानदारांना २५ हजाराचा दंड

पाचोरा, प्रतिनिधी ।   शहरात लॉकडाऊनचे दरम्यान शासनाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून आपले व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या व्यवसायीकांना नगरपरीषद व पोलिस पथकाने संयुक्तपणे  आठवडाभरात तिसरी कारवाई करुन  २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. 

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांना व्यावसाय करण्याची परवानगी नसतांना काही कापड दुकानदार व्यवसाय करतांना नगरपरिषद व पोलीस पथकाला आढळून आलेत.  यात अग्रवाल गारमेंट,  नक्षत्र गारमेंट,  केंब्रीज कापड दुकानांचा समावेश आहे. या दुकानदारांना  प्रत्येकी ५ हजार तर  बाबा शुज १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे  विना मास्क  फिरणाऱ्या नागरीकांकडून एकुण २५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचं नेतृत्वाखाली पथकाद्वारे करण्यात आली.  पथकात प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, गणेश चौबे, हवालदार नंदकुमार जगताप, नगरपरीषदेचे साईदास जाधव, दिलीप मराठे, राजेंद्र शिंपी, दगडू मराठे, भागवत पाटील,  महेंद्र गायकवाड, अनिल वाघ, विलास देवकर, प्रशांत कंडारे, विजय निकम, विजय ब्राम्हणे, अनिल ब्राम्हणे, गोपाल लोहार आदींचा समावेश होता.

 

Protected Content