आरोग्य सेवेत सुधारणा करा – यावलकरांची मागणी

यावल प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात सद्या शासकीय निधीतुन वेगाने प्रसुतीकक्षाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला घेवुन शहरात व परिसरात विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले असुन ग्रामीण रुग्णालयात देखाव्यासाठी नव्या इमारती बांधण्यापेक्षा आरोग्य सेवेत सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

या संदर्भात वृत्त असे असे की, मागील वर्षी तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी लोकसहभागाचा पुढाकार घेत सुमारे ७ लाख रुपये लोकवर्गणीतुन कोरोना विषाणु संसर्गाच्या काळात रुग्णांचे यावल येथेच उपचार शक्य होईल या दृष्टीकोणातुन सुमारे ३० ऑक्सीजन बॅड सेन्टरची उभारणी केली.

या ऑक्सीजन सेन्टरच्या कामास पुर्ण करण्यास एक वर्ष झाले, मात्र तरी देखील एकाही कोरोना रुग्णास प्रत्यक्षात या ऑक्सीजन सेन्टरचा फायदा झालेला नाही. याबाबत अनेक दानसुरांनी अशा प्रकारच्या बेजाबबदार कार्यावर उघड उघड आपली नाराजी व्यक्त केली असुन जर या ठीकाणी ऑक्सीजन सेन्टरला तज्ञ डॉक्टर नव्हते तर मग हे लोकवर्गणीचे ७ लाख खर्च करण्याची गरज काय होती.

यावल ग्रामीण रुग्णालया हे फक्त नावालाच रुग्णालय असुन या ठीकाणी औषद्य उपचाराचा मोठा आभाव नेहमीच दिसुन येत असतो. अगदी छोटयाशा अपघाताचे रुग्णही असलेतर त्यांना तात्काळ जळगाव सिव्हील किंवा आर्थीक दृष्टया सक्षम असलेल्या रुग्णास तात्काळ खाजगी रुग्णालयात घेवुन जाण्याचा सल्ला देण्यात येतो असे नेहमीच या ठीकाणी घडत असते. जर इंथ रुग्णांवर जर नावालाच उपचार होत असेल तर यावलच्या ग्रामीण रुग्णालयापेक्षा ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केन्द्र चांगले असे म्हणाची वेळ आली आहे.

प्रसुतीच्या रुग्णाबद्दल देखील हाच विषय आहे. त्यांचे कडे देखील शासनाने ठरवुन दिलेल्या आरोग्य विभागाच्या नियमाप्रमाणे प्रसुती व औषध उपचार करण्यात येत नसल्याची अनेकांची ओरड आहे. अशा प्रकारे फक्त नावालाच उभ्या असलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या औषद्यपचार व्यवस्थीत करण्यात येत नाही अशी ओरड नेहमीच नागरीकांकडुन करण्यात येत असते. मग ज्या ठीकाणी रुग्णांची उपचाराच्या नावाखाली फक्त विचारपुस व थातुरमातुर उपचार करून दुर्लक्ष करण्यात येत असते. अशा अनेक तक्रारी नागरीकांच्या आहेत.

Protected Content