फिनोलेक्स पाइप्सचा ‘गिव्ह विथ डिग्नीटी’ उपक्रम; गरजूंना मोफत किराणा किटचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । फिनोलेक्स पाइप्स आणि पुण्यातील मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त ‘गिव्ह वीथ डिग्नीटी’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील ८०० कुटुंबियांना मोफत किराणा किटचे वाटप करण्यात आले.

या अत्यंत स्तुत्य उपक्रमांतर्गत भारतातील २४ राज्यामधे ७० हजार कुटुंबांना मोफत किराणा किट वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झेंडा दाखवून या उपक्रमाची सुरवात केली. चार जणांच्या कुटुंबाला २१ दिवस पुरेल इतके व अल्प उत्पन्न गटातील लोक आणि वैश्विक कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या लोकांना मोफत किराणा किट वाटप करण्यात आले. या योजनेत प्रामुख्याने शेतकरी, लघु , गृहउद्योग यांच्याकडून धान्य आणि वस्तु खरेदी करून, एक किट तयार करून गरजू व विस्थापित व्यक्ति व कुटुंबाना मोफत दिले गेले.

अल्प उत्पन्न गटातील लोक कोरोनाच्या काळात बेरोजगार झालेले लोक यांचे जीवन तसेच दिवाळी सन सुकर होण्याच्या दृष्टिकोणातून फिनिलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचे हे किराणा किट जळगाव शहरातील ७ नगरामधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ -जनकल्याण समिती सेवा विभाग यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला. जळगाव शहरात १३ आणि १४ नोव्हेम्बरला ३०० किराणा किट वाटप करण्यात आले पाचोरा आणि भडगांव तालुक्यात १०, ११ आणि १२ तारखेला ५०० जणांना हे किट देण्यात आले.

याप्रसंगी भडगाव येथील कार्यक्रमात खासदार उन्मेष पाटील, श्रीपाद एजेंसीचे मालक निरंजन पाटील तर पाचोरा येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील, बोहरा पाइप्स आणि इलेक्ट्रिक मोटरचे मालक मुर्तुजा बोहरा, आधारवड सामाजिक संस्था आणि बोहरा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी जळगाव येथील विक्री अधिकारी विशाल काकाणे आणि धुळे येथील श्रीनिवास वराडे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content