पियुष पाटील यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू व नुतन मराठा महाविद्यालयात सामूहिक कॉपी प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते पियुष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.

 

पियुष नरेंद्र पाटील यांनी नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांच्यावर सामूहिक कॉपी प्रकरणाबाबत केलेल्या तक्रारीकडे कुलगुरू पी.पी.पाटील यांनी यांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि संचालक धनराज माने यांच्याकडे केली होती. त्यानंतर मंत्री महोदयांनी या संदर्भात तक्रारीवर तात्काळ चौकशी करून कारवाईचे आदेश कुलगुरूना दिले होते. परंतू तरीदेखील कुलगुरू पी.पी.पाटील यांनी आदेशाला केराची टोपली दाखविली होती. दरम्यान, पीयुष पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे मंत्री उदय सामंत आणि संचालक धनराज माने यांच्या आदेशावर कारवाई न केल्याबाबत कुलगुरू यांचा राजीनामा घेण्याबाबत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेत सदर तक्रार ही उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे.

 

कुलगुरूंनी खुलासा करावा

पियुष नरेंद्र पाटील यांनी कुलगुरूंनी काही प्रश्नांचा खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. त्यात कुलगुरू पी.पी. पाटील यांनी प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांची चौकशी समिती नेमली आहे. त्यात कोणकोणत्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे ते जाहीर करण्याचे आव्हान केले होते तसेच कुलगुरू यांनी संस्थेचे पत्रव्यवहार करीत असताना संस्थेत अस्तित्वातच नसलेल्या पदाकडे (मानद सचिव) यांच्याकडे कारवाईचे अधिकार दिले होते. पण सामूहिक कॉपी प्रकरणी संस्थेचा काहीही संबंध नसून कारवाई ही कुलगुरू यांनी स्वतः त्या समितीचे अध्यक्ष होते करायची असल्याचे म्हटले होते होते. पण अद्याप ही मा. कुलगुरुं यांनी कुठलाच खुलासा केलेला नसल्याचे पियुष पाटील यांनी म्हटले आहे.

Protected Content