मालेगावात आणखी ३६ जण कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (वृत्तसंस्था) मालेगाव शहर राज्यातील कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. नुकतेच मालेगावात ३६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मालेगावमधील रुग्णांची संख्या १६५ वर पोहोचली आहे.

मालेगावात आज आणखी ३६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात एका ९ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावातील ७ जण कोरोनामुक्त झाले होते. पण त्यानंतर आज पुन्हा ३६ नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे. मालेगाव शहरातील एकूण १४ परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यात मोमीनपुरा, कमालपुरा, मदिना बाग, इस्लामाबाद, आझाद नगर, दत्त नगर हे भाग झोपडपट्टीचे आहे. दरम्यान, रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Protected Content