जगात कोरोनाचे सव्वा आठ लाख बळी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जगातील १८० हून अधिक देशांमध्ये कोरोनाचे थैमान सुरु आहे . भारतासारख्या लोकसंख्या जास्त असलेल्या देशात संक्रमणाचा धोका आणखीनच वाढलेला आहे . जगभरात आत्तापर्यंत २.४१ कोटींहून अधिक जण करोना संक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. ८.२५ लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला.

भारतातही आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी जारी केलेल्या आकड्यांनीही नवीन रेकॉर्ड केला. २४ तासांत भारतात कोविडचे नवीन ७५ हजार ७६० नवीन संक्रमित रुग्ण दाखल करण्यात आलेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या ३३ लाख १० हजार २३४ वर पोहचलीय.

देशात ७ लाख २५ हजार ९९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.२४ तासांत देशात १०२३ मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे एकूण मृत्युंची संख्या ६० हजार ४७२ वर पोहचलीय. आत्तापर्यंत या आजारावर मात करणाऱ्यांची एकूण संख्या २५ लाख २३ हजार ७७१ वर पोहचलीय. आत्तापर्यंत देशात एकूण ३ कोटी ८५ लाख ७६ हजार ५१० सॅम्पलची चाचणी करण्यात आलीय. .

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
देशात अनेक राज्यांत रुग्णांच्या संख्येनं अचानक जोर धरलेला दिसून येतोय. महाराष्ट्रात बुधवारी सर्वाधिक म्हणजेच १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. कर्नाटकात बुधवारी १३३ रुग्णांचा मृत्यू झाला. उउत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, ओडिशा, हरियाणा आणि उत्तराखंड यांसारख्या राज्यातही संक्रमणाच्या आकडेवारीत वाढ दिसून येतेय.

Protected Content