३५० पेक्षा जास्त उमेदवार असल्यास ईव्हीएम ऐवजी मतपत्रिेकेवर घ्यावे लागेल मतदान

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर समाजातील कमीत कमी ४०० उमेदवार निवडणूक उमेदवारी घ्या त्यामुळे प्रशासनाला मतपत्रिकेवर मतदान करण्याला भाग पाडावे. मराठा आंदोलकांच्या या खेळीने जिल्हा प्रशासनासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्याची मागणी पुढे करत आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. अर्ज जर जास्त आले तर ईवीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची कसरत करावी लागणार आहे.

मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करणे पण जिकरीचे काम असणार आहे. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर, मतपत्रिकावर निवडणुक घ्यावी लागते. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यात लढा सुरु आहे. या लढ्याला यश येत असतानाच सगेसोयरेवरुन सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. दहा टक्के मराठा आरक्षण देऊन सरकारने फसवणूक केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर मराठा आंदोलक आता निवडणुकीतून त्यांचा रोष व्यक्त करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अधिकाधिक उमेदवार उभे करण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे.

Protected Content