कोरोनाबाबत जनतेमध्ये व्यापक जागृती घडवणे आवश्यक ; पवारांचा मुख्यमंत्र्याना सल्ला

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना हा आजार इतक्या लवकर हद्दपार होणार नाही. त्यामुळे त्याला जीवनाचा एक भाग समजून, त्याच्यापासून सावध राहून, आरोग्य सांभाळण्याबाबत जनतेमध्ये व्यापक जागृती घडवणे आवश्यक असल्याचा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. पवार यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

 

यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली राज्यातील व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. लॉकडाऊनच्या काही अटी शिथील करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागेल. याकरता दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनाने आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी. दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जातील याकडे कृपया पहावे, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच पवार यांनी लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर येण्यासाठी काय करायला हवे याबाबत आपले मत मांडले. वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध क्षेत्रातील उपाययोजनांबाबत काही सूचना सरकारला केल्या.

Protected Content