Home आरोग्य मालेगाव येथून बंदोबस्तावरून परत आलेल्या एसआरपीच्या चार जवानांना कोरोनाची लागण

मालेगाव येथून बंदोबस्तावरून परत आलेल्या एसआरपीच्या चार जवानांना कोरोनाची लागण

0
34


हिंगोली (वृत्तसंस्था) मालेगाव येथून बंदोबस्तावरून परत आलेल्या एसआरपीचे आणखी चार जवानांना कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ झाली आहे. दरम्यान, एसआरपीच्या या सर्व जवानांना विलागीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.

 

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारामधील अधिकारी व जवान मालेगाव व मुंबई येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीमध्ये परतले होते. त्यांनतर १९४ अधिकारी व जवानांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी सहा जणांना करोनाची लागण झाल्याचा अहवाल २१ एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करून चार जवानांचे दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या थ्रोट स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याआधी या चारही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.


Protected Content

Play sound