वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जवानाची आत्महत्या

suicide indonesia

 

हिंगोली (वृत्तसंस्था) हिंगोली येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या जवानाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. विष्णू मंदाडे असे या मयत जवानाचे नाव असून वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मंदाडे यांनी आत्महत्या केल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप आहे. दरम्यान, विष्णूच्या मोठ्या भावाने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या विरोधात लेखी तक्रार सुद्धा दिली आहे.

 

 

विष्णू मंदाडे यांना 2014 मध्ये त्यांना नोकरी लागली होती. ते कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी येथील रहिवासी होते. विष्णू यांची वरिष्ठ त्यांची वारंवार दूरदूर पर्यंत ड्युटी लाउन पिळवणूक करीत असत. कुणी ही गैरहजर राहिल्यास त्याचा भार विष्णू मंदाडेवर येऊन पडायचा. दूर दूर त्यांच्या ड्युट्या लावल्या जायच्या. जवळ ड्युटी हवी असेल तर वरिष्ठांना पैसे पुरवावे लागत’, अशा गंभीर बाबी विष्णू यांनी आपल्या कुटुंबियांना अनेकदा सांगितल्या होत्या. ते काल रजेवर आले होते. रजेवर येण्यापूर्वी त्यांचे आणि त्यांच्या वरिष्ठांचे यावरूनच खटके उडाले होते. याच रागातून विष्णू मंदाडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबायांनी केला आहे.

Add Comment

Protected Content