तोंडी तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा दाखल

एरंडोल प्रतिनिधी | तालुक्यातील कासोदा येथील विवाहितेला तोंडी तलाक दिल्याप्रकरणी पतीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार कासोदा येथील रहिवासी मन्सुर खान तमीज खान यांची मुलगी रुखसारबी शकील बेग यांचा, गावातील शकील बेग नथ्थू बेग यांच्याशी ११ मे २००० रोजी मुस्लीम रितीरिवाजानुसार निकाह झाला होता. काही दिवस त्यांना त्रास झाला नाही. मात्र २०११ नंतर तिचा सासरी छळ सुरू झाला. तिचे पती शकील बेग, सासरे नथ्थु बेग भिकारी बेग, सासू हुसेना बी, दीर खलील बेग नथ्थु बेग, देरानी परवीन बी खलील बेग हे तिच्या चारीत्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करायचे. म्हणून रुखसारबी यांनी दि. १९ मे २०२१ रोजी त्यांच्याविरुद्ध कासोदा पोलिस स्टेशनला कलम ४९८-(अ) ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे फिर्याद दिली. त्या नंतर रुखसारबी आई वडीलांकडे राहण्यास निघून गेली. तेव्हापासून त्या त्यांच्याकडेच राहत आहेत. २४ जुलै २०२१ रोजी रुखसारचे पती शकील बेग यांनी वकीला मार्फत तलाक मिळण्यासाठी नोटीस पाठवली होती. नांदण्यासाठी तयार असल्याचे उत्तर त्यांनी नोटीसला दिले होते. यानंतर ३० जुलैला रुखसारबीच्या माहेर येऊन पती शकील बेग याने मी तुला तलाक देत आहे, असे तीनवेळा म्हणून तलाक दिला होता.

या प्रकरणी रुखसारबीने पती शकील बेग नथ्थु बेग याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास एपीआय रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Protected Content