भाजपकडून राज ठाकरेंच्या विरोधात दाखविले जाणारे व्हिडीओ निवडणूक आयोगाने तपासावेत : मिलिंद देवरा

milind deora 1

 

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभांमध्ये व्हिडीओ दाखवत भाजपच्या अनेक दाव्यांची पोलखोल केली आहे. भाजप देखील व्हिडीओ दाखवून 27 एप्रिल रोजी उत्तर देणार आहे. परंतु 27 एप्रिलला मुंबईतील प्रचाराची मुदत संपत आहे. त्यामुळे भाजप जे व्हिडीओ दाखवेल त्यावर कोणताही पक्ष किंवा नेता उत्तर देऊ शकणार नाही. भाजप जे आरोप करेल ते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून येईल जे मतदारांना प्रभावित करेल. त्यामुळे भाजप जे व्हिडीओ दाखवणार ते आधी तपासून घेण्यात यावी, असे दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

 

आता ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मोदी-शाहांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपदेखील व्हिडीओचाच आधार घेणार आहे. 27 तारखेला होणाऱ्या भाजपच्या सभेत मनसेला मनसेच्याच स्टाईलने उत्तर मिळणार असल्याचे विनोद तावडेंनी सांगितले आहे. त्यामुळे मनसे आणि राज ठाकरेंची पोलखोल करणारा कोणता व्हिडीओ भाजपच्या हाती लागलाय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या विरोधात भाजप जे व्हिडीओ दाखवणार ते निवडणूक आयोगाने तपासावेत अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यावर याबाबत काही छापून येणार असेल किंवा दाखवण्यात येणार असेल तर ते नियमित असावे अशी मागणी मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.

Add Comment

Protected Content