समरसता महाकुंभासाठी आयोजकांतर्फे विविध समित्या स्थापन

 

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर तथा अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार आयोजित भव्य दिव्य अशा समरसता महाकुंभासाठी आयोजकांनी विविध समित्या स्थापन करून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्या त्या ठिकाणी पोलीस व स्वयंसेवकांची नेमणूकही करण्यात येणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन करण्याचे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज तसेच श्री राधे राधे बाबा यांनी केले आहे. समरसता महाकुंभासाठी वढोदा येथे भाविकांना येण्या- जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसेस नियमित ये-जा करून फेऱ्या मारणार आहे.

यात फैजपूर बस स्थानक ते वढोदे, सावदा बस स्थानक ते वढोदे असा येण्या जाण्याचा मार्ग असून प्रवास करण्यासाठी भाविकांना नियमाप्रमाणे तिकीट भाडे आकारणी केली जाणार आहे. जिल्ह्यातून वढोदा येथे येण्यासाठी पिंपरुड गाव पासून ते निष्कलंक धाम वढोदे येथे आत येण्यासाठी, पुढे बाहेर जाण्यासाठी विरोदा ते आमोदे तसेच पिंपरुड फाटा असा एकेरी (वन वे) मार्ग बाहेर पडण्यासाठी करण्यात आला आहे. या मार्गावर विरुध्द दिशेने कोणतेही वाहन जाणार नाही. याच मार्गावर कार्यक्रम स्थळाच्या काही अंतरावर संत महंतांसाठी विशेष पार्किंग असणार आहे.

भाविकांसाठी वढोद्या पासून काही अंतरावर पिंपरुड रस्ता, विरोदा व थोरगव्हाण रस्त्यावर नियोजित स्थळापासून जवळ वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या पार्किंग मध्ये लक्झरी, बस, टेम्पो ट्रॅव्हलर, चार चाकी वाहन, ट्रॅक्टर, दुचाकी वाहन यासह अन्य वाहनांसाठी स्वतंत्र नियोजित जागा राहील, त्याच ठिकाणी स्वयंसेवकांनी सांगितल्याप्रमाणे आपले वाहन उभे करावे लागणार आहे.

प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक, स्थळदर्शक बोर्ड लावण्यात येणार आहे. प्रत्येक भाविकांनी कोविड संदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा तसेच समितीने जी व्यवस्था व नियोजन केले आहे त्याला सर्वांनी उत्तम प्रतिसाद व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व राधे राधे बाबा यांनी केले आहे.

Protected Content