आज शेतकर्‍यांना आधार आवश्यक होता ! : रविकांत तुपकर

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना रोमच्या राजाशी करत या दौर्‍यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्‍यांसह काल अयोध्येचा दौरा केला. या दौर्‍यावर स्वाभीमानीचे नेते रविकांत तुपकार यांनी जोरदार टिका केली आहे. राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलेलं असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्या दौर्‍यावर आहेत. त्यामुळे या दौर्‍यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना रोमच्या राजाशी करत या दौर्‍यावर टीका केली आहे.

या संदर्भात बोलतांना रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे अशी टीका रविकांत तुपकर यानी केली आहे. ते म्हणाले, वादळी वार्‍यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय अनेक आमदारांना घेऊन अयोध्या दौर्‍यावर गेले आहेत. हे अयोध्याचे दर्शन उशिरा सुद्धा घेता आल असतं. पण आज महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आधार देण्याचं काम सरकारच होतं असे तुपकर म्हणाले.

Protected Content