शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद (व्हीडीओ)

sharad pawar

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत मार्गदर्शन केले. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपप्रमाणे हायटेक प्रचाराची सुरुवात केली असून यावेळी शरद पवार यांनी राफेल प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली.

 

शरद पवार यांनी आज जळगावसह कोल्हापूर, सातारा, ईशान्य मुंबई, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, रावेर या महासंघातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी शरद पवार पुढे म्हणाले लोकसभेची निवडणूक लवकरच होईल. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. बुथ निहाय कार्यकर्त्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार 25 ते 30 मतदारांमागे एक कार्यकर्ता अशी रचना करण्यात येणार आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघात तुमच्याकडून पक्षाला नाव सुचविले गेले होते. त्यानुसार गुलाबराव देवकर हे कामाला लागले आहेत. आता सर्वांनी मिळून पक्षाला याठिकाणी विजय मिळवून द्यायचा आहे. पवार पुढे म्हणाले की, राफेलची कागदपत्र चोरीला गेली तर, सरकारने गुन्हा का दाखल केला नाही? यावरून राफेलमध्ये मोठा घोटाळा आहे. आजवर केंद्र सरकारने राफेल विमान व्यवहारासंदर्भातील माहिती लपवून ठेवत होती. आता राफेल व्यवहाराची कागदपत्रेच चोरीला गेल्याचे सरकार सांगत आहे. ही बाब अत्यंत गंभीर तसेच या संपूर्ण व्यवहारावरच संशय निर्माण करणारी असल्याचे देखील ते म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी पालकमंत्री आ.सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आ.राजीव देशमुख, माजी आ.दिलीप वाघ,मा. खासदार वसंत मोरे, मा. आ. संतोष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बुथप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Add Comment

Protected Content