परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन एक अनोळखी व्यक्ती मृत्यमुखी पडली असून त्याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.

 

 

 

परधाडे रेल्वे स्थानकानजीक कि. मी. खंबा क्रं. ३६७ / ११ डाऊन पटरीजवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडुन एका अनोळखी व्यक्तीचा  मृत्यू झाल्याची घटना सकाळी ११:३० वाजेच्या पुर्वी घडली. या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक तुषार विसपुते हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या सोबत घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला असता मयताचे अंदाजे वय ३५ वर्ष असुन मयत व्यक्तीजवळ कुठलाही ओळखीचा पुरावा आढळुन आला नाही. रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने मयताचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून मयताच्या नातेवाईकांचा शोध पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल भगवान बडगुजर हे घेत आहेत. मयताविषयी कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन पाचोरा पोलिस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content