जागतिक टपाल दिनानिमित्त उपडाकपालांचा सत्कार

पारोळा प्रतिनिधी । जागतिक टपाल दिनानिमित्त येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद भावसार यांनी उपडाकघर कार्यालयात स्वत: जाऊन उपडाकपाल जे. डी.  ठाकुर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार मिठाई व शुभेच्छा पत्र देऊन भावपूर्ण सत्कार केला आहे.

यावेळी सर्व कार्यालयीन व गृप डी कर्मचारी नि पोस्टमन यांना मिठाई वाटपही केली. सदर प्रसंगी उपडाकपाल श्री ठाकुर व टी. एस्. पाटील यांनी भावसार सरांबद्दल आदर व्यक्त करुन आभार मानले. भावसार सर यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल शहरात आनंद व्यक्त केला जात आहे

Protected Content