जोगलखेडे येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखेची स्थापना

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथे आपल्या भारतामध्ये सर्व प्रकारचच्या संघटना असून त्या संघटनेच्या माध्यमाने ते लोक संघटित होऊन शासनावरती दबाव आणून काम करून घेत असतात हे आपण जाणून आहात परंतु शेतकरी हा संघटित होत नाही. हे मागील काही काळामध्ये दिसत होते. परंतु महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने शेतकऱ्यांना संघटित करून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यात येत आहे म्हणून शेतकऱ्यांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे त्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावागावांमध्ये महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने शाखांच्या स्थापना करण्याचे कार्य सुरू आहे आणि त्याला शेतकऱ्यांकडून उत्तम प्रसिद्ध मिळत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले ते जोगलखेडा तालुका पारोळा येथे शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पारोळा तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी विशेष उपस्थिती म्हणून भडगाव तालुक्याचे अध्यक्ष अभिमन हाटकर तसेच पारोळा तालुका कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील हे उपस्थित होते तर शाखा मार्गदर्शक म्हणून जोगलखेडा चे माजी सरपंच अनिल जिजाबराव पाटील यांनी जबाबदारी पाडली. शाखा कार्यकारणी खालील प्रमाणे शाखाध्यक्ष म्हणून सुजय पाटील,कार्याध्यक्ष म्हणून संदिप पाटील,उपाध्यक्ष म्हणून सुनील पाटील, माहिती प्रमुख म्हणून विनोद पाटील, संपर्क प्रमुख म्हणून भुषण पवार, खजिनदार म्हणून चेतन पाटील,महासचिव म्हणून प्रविण पाटील सचिव म्हणून निलेश पाटील, प्रसार माध्यम प्रमुख म्हणून अतुल पाटील, सल्लागार म्हणून संदिप पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून जितेंद्र पाटील, आरोग्य प्रमुख म्हणून कुंदन पाटील,सदस्य म्हणून सुखदेव पाटील, किरण पाटील, सतीश पाटील, प्रशांत पाटील,अतुल पाटील, दीपक पाटील, नाना पाटील, उखा मोरे, सुनील पाटील, जगदीश पाटील, विनोद पाटील, हेमंत पाटील, राहुल पाटील, मनोज पाटील यांची देवरे यांनी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात येऊन गावात संघटनेची शाखा स्थापन केली.यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुजय पाटील यांनी मांडले.

Protected Content