Home क्राईम पिंपरखेड मारुती मंदिरात डल्ला मारणारा चोरटा जेरबंद !

पिंपरखेड मारुती मंदिरात डल्ला मारणारा चोरटा जेरबंद !

0
8

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपरखेड येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात अज्ञात चोऱ्यांनी डल्ला मारत मूर्तीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून चोरट्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आसाराम त्र्यंबक पाटील (वय ६९ वर्षे, रा. बहादरपूर, ता. पारोळा) हे पिंपरखेड येथील मारुती मंदिरात पूजारी म्हणून काम पाहतात. ९ जून २०२६ रोजी सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे राम मंदिराचा दरवाजा उघडून मारुती मंदिराजवळ आले. मंदिरात झाडू मारत असताना, त्यांना मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि कानावरील चांदीची मासळी गायब असल्याचे दिसून आले. चोरांनी गाभाऱ्यात प्रवेश करून मूर्तीचे दागिने चोरून नेले होते, तर गळ्यातील चांदीचा हार मात्र तिथेच मिळून आला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलीस निरिक्षक योगेश महाजन, हवालदार संदीप सातपुते, कैलास साळुंखे यांनी या प्रकरणाचा तपास केला. यात तालुक्यातील हिरापूर येथील आरोपी हिरालाल अरुण पाटील यास अटक करुन मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीसांच्या या कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound